
नाशिक । प्रतिनिधी Nashik
उद्योजकांच्या निमा( NIMA) संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी मुलाखतींच्या तारखा निश्चित करण्यात येणार असून त्याबाबतची घोषणा व मुलाखतींचे नियोजनाची माहिती सोमवारी दिली जाणार असल्याचे समजते.
धर्मादाय सहआयुक्तांनी संस्थेच्या फेरफार अर्जासह अन्य खटल्यांबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी शुक्रवारची मुदत दिली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणी बैठकीत धर्मदाय आयुक्त यांनी याबाबतची मुलाखतींची सविस्तर तारीख व नियोजन सोमवारी कळवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विश्वस्त निवडप्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.
विश्वस्तपदासाठी निमाच्या अर्ज करणार्या 39 इच्छुकांपैकी सर्वसंमतीने सात नावे कळवण्यासाठी तीनही गटांच्या प्रतिनिधींना दिली होती. मात्र त्यांच्यात तडजोड होऊ न शकल्याने शुक्रवारी त्याबाबत निर्णय घेण्याचा विचार सह धर्मदाय आयुक्त यांनी स्पष्ट केला होता. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी 39 अर्जदारांच्या मुलाखती घेऊनच विश्वस्त मंडळी नेमणूक करण्याचे निश्चित केले आहे त्यानुसार सोमवारी या संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.