निमा हाऊस
निमा हाऊस
नाशिक

निमा त उद्योजकांचा सुरू सत्तासंघर्ष

विश्वस्त मंडळ व विद्यमान पदाधिकारी आमने-सामने

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | प्रतिनिधी

निमाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ आज (दि. 31) रोजी संपुष्टात आला. करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुका होऊ न शकल्याने नवीन कार्यकारिणीची निवड होऊ शकली नाही. संस्थेची पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी विश्‍वस्त मंडळाची बैठक आज (दि. 31) रोजी पार पडली.

निमाच्या 2004 घटनेतील कलम 34.1 व 34.3 नुसार विश्वस्त मंडळाला वरील परिस्थितीत विशेष कार्यकारी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष मनिष कोठारी यांनी दिली.

विशेष कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी विवेक गोगटे , सरचिटणीसपदी आशिष नहार यांची तर खजिनदारपदी संदीप भदाणे यांची विश्‍वस्त मंडळाच्या सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

कोठारी म्हणाले की, 2004 च्या घटनेनुसार दोन वर्षापुर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आताच सत्ताधार्‍यांना घटना अस्तित्वात नाही, हे का वाटते?

संस्थेच्या विकासासाठी विश्‍वस्त मंडळाची मोठी जबाबदारी असुन ती यशस्वीपणे पार पाडत आहोत.

बैठकीस विश्‍वस्त मंडळाचे सदस्य संजीव नारंग, मंगेश पाटणकर उपस्थित होते. बैठकीला निमंत्रित सदस्य विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव तुषार चव्हाण अनुपस्थित होते

निमाचे विश्‍वस्त मंडळ हे 2004 च्या घटनेनुसार कायमस्वरूपी असते. दरवर्षी केवळ एक माजी सदस्य निवृत्त होऊन नवीन माजी अध्यक्षांची निवड करण्यात येते. त्यामुळे घटनेने विश्‍वस्त मंडळाला अधिकार दिले असुन त्यानुसार विशेष कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहेत. त्यानुसार पुढील कालावधीत आता विशेष कार्यकारी समिती काम करणार आहे.
मंगेश पाटणकर, सदस्य, विश्‍वस्त मंडळ
Deshdoot
www.deshdoot.com