३१ तारखेला ठरणार निमा निवडणुकीची दिशा
Election Image
नाशिक

३१ तारखेला ठरणार निमा निवडणुकीची दिशा

उद्योजकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे नाराजी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सातपूर | प्रतिनिधी

निमाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा राजकीय शिमगा सुरू झाला आहे. परस्परांवरील कुरघोड्यांच्या राजकारणामुळे संस्था उद्देशापासून भरकटत असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये आहे.

प्रत्यक्षात निवडणुकी संदर्भातील निर्णय 31 जुलै रोजी समजणार असल्याने प्रतीक्षा लांबत असल्‍याचे चित्र आहे.

गेल्या काही काळापासून कोविडच्या त्रासामुळे उद्योग क्षेत्र अडचणीतून जात आहे. अनेक समस्यांना सामोरे जात असतानाच उद्योगाची कधी सांभाळणे कठीण झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निमाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादळामुळे उद्योजक व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान, निमा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोप द्वारे परस्परांवर चिखलफेक होत आहे.

विद्यमान पदाधिकाऱ्यांनी नोंदवण्यावरच आक्षेप घेतला असून, विरोधकांनी मात्र हे खोटे असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.

विद्यमान कमिटीतील सदस्य मनीष रावल यांच्यानुसार घटनेची नोंदणी केलेली नसती तर विद्यमान कमिटीने दोन दुरुस्त्यांच्या सुचना कशा दिल्या? त्या सुचवणे म्हणजेच इतर कलम अथवा घटना असल्याचे मान्य करणे होय असे रावल यांनी सांगितले.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर 31 जुलैरोजी शासनस्तरावरून अनलॉक चे निकष स्पष्ट केले जाणार आहेत. यात कोणकोणत्या गोष्टींना सवलती दिल्या जातात. यावर निमाच्या आगामी निवडणुकीचे चित्र ठरण्याची शक्यता आहे.

त्यानुसारच निवडणुकांची मुदतदेखील पुढे मागे जाण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ द्यायची किंवा प्रशासक नेमण्याचा अधिकार हा बीओटीला असल्याने 31 जुलै च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर नेहमी स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूकीचा कार्यक्रम थांबवला असला तरी थांबलेल्या प्रक्रियेपासून योग्य वेळी तो पुढे सुरू केला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी डी.जी.जोशी यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रातील अनेक समस्यांची कोंडी सोडवण्यासाठी निमाचे व्यासपीठ हे मुख्य केंद्र आहे. विमानसेवा सुरू करण्यापूर्वी देखील मोठमोठ्या विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमाला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला होता. विविध देशांच्या दूतावास यांच्या माध्यमातून उद्योग व व्यापार संबंध विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले होते.

Deshdoot
www.deshdoot.com