वीज प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याची 'निमा'ची मागणी

वीज प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याची 'निमा'ची मागणी

सातपूर | प्रतिनिधी Satpur

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी वंदना पगारे ह्या रुजू झाल्या बद्दल निमा तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध विविध प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याची विनंती निमा च्या वतीने करण्यात आली.

यावेळी निमाचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मुख्य अभियंत्यांचे स्वागत केले यावेळी तुषार चव्हाण, कैलास आहेर, रावसाहेब रकिबे, संजय महाजन उपस्थित होते .यावेळी झालेल्या चर्चेत उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या सध्याच्या वीजवितरण व वीज देयक , वीजदरवाढ तसेच सध्याचा मागणी आकार इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

मुख्य अभियंता पगारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या अखत्यारीत असलेले प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतु जे विषय धोरणात्मक आहेत ते वरिष्ठ सचिव अथवा मंत्रालय स्तरावर पाठविण्याचे स्पष्ट केले.

यावेळी निमातर्फे विविध समस्यांबाबत सभासदांना माहित होण्याकरता वेबिनार आयोजित करणार असल्याचे सांगितले व त्या वेबिनार मध्ये मुख्य अभियंता व इतर अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

मुख्य अभियंता वंदना पगारे यांनी सध्या उद्योगांना भेसडावणाऱ्या विविध समस्या व त्याबाबत माहिती देण्याकरता वेबिनार हे अतिशय चांगले माध्यम असून, त्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केले .

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com