नाशिक भूषण पुरस्काराने निलीमाताई सन्मानित

रोटरीच्या शानदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण
नाशिक भूषण पुरस्काराने निलीमाताई सन्मानित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (MVP) सरचिटणीस निलिमाताई पवार (Nilimatai Pawar) यांना नाशिक भुषण पुरस्कार (Nashik Bhushan award) देऊन रोटरी क्लबने एकप्रकारे शहरातील कर्तुत्ववान महीला शक्तीचाच सन्मान केला आहे....

असे प्रतिपादन माजी आमदार व नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी आज येथे केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक (Rotary Club Of Nashik) तर्फे आज निलीमाताई यांना त्यांच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेतील भरीव शैक्षणिक कार्याबद्दल नाशिक भुषण पुरस्कार टकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ व रोख रुपये 11000/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार निलीमाताई या्ंच्यासह सस्थेचे चिटणीस डॉ सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, नानासाहेब महाले, प्रशांत देवरे यांनी स्विकारला. रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. श्रेया कुलकर्णी व पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.

निलिमाताई पवार यांच्या कार्याचा आलेख पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करतांना उपकृत झाल्याची भावाना व्यक्त होत आहे. सध्या सर्वत्र डिजिटलचे वारे वाहत आहेत. विद्यापीठ सुध्दा डिजिटल होणार आहे. कोणालाही कोणतीही पदवी घेता येणार आहे.

मात्र, यात मानवी संबंध कसे राहतील संस्कार कसे होतील. हा गहन प्रश्न आहे. त्यात महत्वाचा दुवा साधण्याचे काम मविप्रच्या माध्यमातूनच होईल. असा आम्हाला विश्वास आहे. संस्थेचा अवाढव्य कारभार पाहता हे स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकते.

दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातुन बांधा पर्यंत शिक्षणाची गंगा नेता येऊ शकते. त्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न करावेत. त्यासाठा रेडीओ सुरु करण्याचा प्रयत्न करावा असे टकले यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना नीलिमाताई म्हणाल्या की, रोटरीने दिलेला हा पुरस्कार लाख मोलाचा आहे. हा पुरस्कार माझ्य एकटीचा नसुन संस्थेतील संचालक, कर्मचारी यांच्या परीश्रमाचा आहे.

हा पुरस्कार मी संस्थापकांना अर्पण करत आहे. यावेळी त्यांनी संस्थेचा झालेला विकास व गेली 12 वर्ष काम करताना आलेल्या कटु गोड आठवणींना उजाळा दिला. डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक सेवाभावी संस्थेच्या गेल्या 77 वर्ष पासून नाशिक मध्ये अविरत सुरु असेल्या कार्याची माहीती दिली.

समाजभिमुख उपक्रमांबरोबरच समाजातील विविध स्तरावरील उत्तम कार्य करणार्‍या लोकांना गौरवण्याचे आणि त्याने कौतुक करण्याचे काम देखील करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून नाशिक भूषण हा अतिशय मानाचा पुरस्कार सहकार, शैक्षणिक, शासकीय, सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय, कृषी ,पर्यावरण इत्यादी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या आणि त्यांच्या कार्याने नाशिकच्या लौकिकात आपल्या कार्याने भर घालणार्‍या व्यक्तींच्या योगदानाबद्दल प्रदान करून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या अशा अतुलनीय योगदानाने नाशिकचे नाव एका नव्या उंचीवर नेले त्या व्यक्तींना हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो.असे त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासक लीना बनसोड (ZP CEO Leena Bansod) यांचा ऑडीओ संदेश ऐकविण्यात आला. डॉ. राजेंद्र नेहते (Dr Rajendra Nehete) यांनी पुरस्कारार्थी निवडीचे माहीती दिली.

मनीष चिंधडे (manish chindhade) यांनी सुत्रसंचालने केले. सचिव मंगेश अपशंकर यांनी आभार मानले. यावेळी दिलीप बेनीवाल, (Sandip Benival) जनसंपर्क संचालक सुधीर जोशी (Sudhir joshi), विनायक देवधर, गौरी पाठक आदीसह पदाधिकारी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com