निफाड: उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन; आरोग्य विभागाकडून निर्णय

निफाड: उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन; आरोग्य विभागाकडून निर्णय

निफाड। प्रतिनिधी | Niphad

येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास (Sub-District Hospital) 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health) मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी दिली आहे.

तालुक्याची लोकसंख्या बघता परिसरातील अनेक गावांचा तालुक्याच्या गावी प्रत्यक्ष संपर्क आहे. सध्या कार्यान्वित असलेले उपजिल्हा रुग्णालयामध्ये फक्त 50 खाटांवर उपचार करण्याचे शक्य होत नव्हते. करोना (corona) कालावधीमध्ये तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असतांना येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालय (Pimpalgaon Baswant Rural Hospital) आणि लासलगाव ग्रामीण रुग्णालय (Lasalgaon Rural Hospital) तसेच इतर खासगी हॉस्पिटलची क्षमता संपल्यानंतर करोना सारख्या महामारीत रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या (Niphad Sub-District Hospital) 50 खाटांची क्षमता दुपटीने म्हणजे 100 खाटांची करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत व लासलगाव (Pimpalgaon Baswant and Lasalgaon) हेही प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. त्यातील निफाड येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास व लासलगाव ग्रामीण रुग्णालय 30 खाटांचे 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. सध्या कार्यान्वित असलेल्या निफाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये 7 मेडिकल ऑफिसर कार्यरत आहे. त्यात वाढ होऊन एकूण 13 मेडिकल ऑफिसर काम करतील.

डोळ्यांची शस्त्रक्रिया (Eye surgery), सिटी स्कॅन (CT scan), सोनोग्राफी (Sonography) या सारख्या सुविधांसह विविध आजारांचे विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहून नाशिकच्या शासकीय रूग्णालयाप्रमाणे सर्व प्रकारच्या सोईसुविधा येथे उपलब्ध होतील. आजमितीस निफाड या तालुक्याच्या जागी या रुग्णालयासाठी 5 एकर जागा उपलब्ध असून उर्वरित जागेत साधारणत: 55 कोटी पर्यंत खर्च करून इमारत व इतर सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) आजमितीस कळवण (kalwan), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) व येवला (yeola) येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन झालेले आहे.

त्यानंतर चौथ्या नंबरवर निफाडला स्थापन होत आहे. त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध होणार असून तालुक्यातील गरजूंना वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार आणि वाढीव सुविधा उपलब्ध होणार असल्याने निफाडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याने या सर्व मंत्र्यांचे आमदार दिलीप बनकर यांनी आभार मानले आहे.

पाठपुराव्याला यश गेल्या अनेक वर्षापासून निफाड उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारावर उपचार होण्यासाठी सर्व सुविधायुक्त रुग्णालय व्हावे याकरीता गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा केला. त्यामुळे बर्‍याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांचा श्रेणीवर्धन करण्याचा प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश आले. गोरगरीब जनतेला निश्चितच सर्व सुविधायुक्त मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

- आमदार दिलीप बनकर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com