रोटरी क्लब नाशिक रिव्हरसाईडचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी क्लब नाशिक रिव्हरसाईडचा पदग्रहण सोहळा संपन्न

नाशिक । Nashik

येथील रोटरी क्लब नाशिक (Rotary Club Nashik) रिव्हरसाईडचा पदग्रहण सोहळा (Inauguration Ceremony) प्रसिद्ध नट दिग्दर्शक आनंद इगंळे (Director Anand Ingle) याच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मावळते अध्यक्ष रोटे संजय कुलकर्णी (Sanjay Kulkarni) यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष रोटे यतिन पटवर्धन (Yatin Patwardhan) सेक्रेटरी रोटे निलेश गर्गे यांच्याकडे नव्या वर्षांची सुत्रे प्रदान करण्यात आली...

यावेळी दिग्दर्शक आनंद इगंळे म्हणाले की, यतिन पटवर्धन यांनी करोना काळात (Corona period) समाजोपयोगी काम केले असून त्यांच्यासोबत काम करताना वेगवेगळे अनुभव आले. तसेच त्यांनी न डगमगता सातत्याने काम करत रहावे असा सल्ला इंगळे यांनी दिला. त्यानंतर रोटे मंजिरी फाळके संपादित बुलेटिनचे प्रकाशन झाले.

तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पुढील वर्षभराच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगून आपली टीम जाहीर केली व त्यांना संचालकपदाची सुत्रे प्रदान केली. तर मावळते अध्यक्ष रोटे संजय कुलकर्णी यांनी त्याच्या वर्षभरातील कार्यकाळ व त्यात केलेले प्रकल्प याची दृकश्राव माध्यमाद्वारे माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी वर्षभर मदत केलेल्यांचा सत्कार करून बेस्ट रोटेरियनची ट्रॅाफी रोटे पवार यांना प्रदान केली.

तर मावळते सेक्रेटरी रोटे जालिंदर शिंदे (Jalindar Shinde) यांनी देखील वर्षभरातील कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला. तर असिस्टंट गव्हर्नर रोटे राजन पिल्लई यांनी नुतन अध्यक्षांना शुभेच्छा देऊन डि गव्हर्नर रोटे झुनझनवाला यांचा संदेश वाचून दाखवला. तसेच रोटे आरती कुलकर्णी यांना नविन सभासद म्हणून समाविष्ट करण्यात आले.

दरम्यान, या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित अध्यक्षांचा परिचय रोटे मकरंद ओक ( Makrand Oak) यांनी करुन दिला. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटे नीता लेले व रोटे सुलक्षणा गर्गे यांनी केले. तर प्रमोद पुराणिक यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास माजी प्रंतपाल दादासाहेब देशमुख (Dadasaheb Deshmukh) यांच्यासह विविध क्लबचे मान्यवर, पदाधिकारी, क्लबचे सभासद, त्यांचे कुटुंबिय व आमंत्रित उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com