नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार

मजूर फेडरेशन संचालक भारत कोकाटेंचा गौरव
नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्याच्या पूर्व भागातील कारवाडी ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत (election) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) गटाच्या सरपंच रुपाली निलेश जाधव सह 6 सदस्यांनी विजय संपादन केला.

तसेच नुकत्याच झालेल्या मजूर फेडरेशनच्या (Labor Federation) संचालकपदी भारत कोकाटे यांचाही विजय झाला. त्यासाठी गावात आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कारात माजी आ. वाजे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.

तालुक्यात नुकत्याच 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका (election) पार पडल्या. यामध्ये वाजे गटाने 7 ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. पूर्व भागातील राजकीय (politics) दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कारवाडी ग्रामपंचायतीत सर्व सहकार्‍यांनी एकत्रित येत यशस्वी युव्हरचना करत विजय संपादन केला. सरपंच रुपाली जाधव, सदस्य मथुरा जाधव, सुनीता जाधव, संगीता तूपसुंदर, रवींद्र जाधव, अजित जाधव, विठ्ठल कातोरे यांच्यासह शहा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सोपान रहाणे यांच्यासह अल्प मताने पराभूत झालेल्या उमेदवारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मजूर फेडरेशनच्या (Labor Federation) तालुका संचालक पदी निवडून आलेल्या कोकाटे यांचाही ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब आदिक, नवनाथ चिरके, रेवबा जाधव, अनिल गुरुळे, बबन जाधव, शिवनाथ जाधव, काशिनाथ जाधव, दादासाहेब जाधव, शांताराम जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन खरेदी विक्री संघांचे संचालक आर. आर. जाधव यांनी केले. आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले.

लोकहिताची कामे करा: वाजे

ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी लोकहिताचे कामे केल्यास आदर्श ग्रामपंचायत म्हणून नक्कीच नावारूपास येईल. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन माजी आ. वाजे यांनी केले. विकासकामांसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी पदाधिकार्‍यांना आश्वासितही केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com