उपजत कलेतून गवसला जगण्याचा नवा मार्ग

फास्टफूड, भाजी विक्रीतून हाताला काम
उपजत कलेतून गवसला जगण्याचा नवा मार्ग
USER

नाशिक । शुभम धांडे

माणसाकडे कला असली तर अनेक कठीण प्रसंगावरही मात करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उपजत कला-कौशल्यातून मार्ग मिळतो. गेल्या दीड वर्षांपासून करोना महामारीत (Corona Crisis) अनेकांच्या रोजगारावर (Employeement) प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

लग्नसराईत वादन करणारे बँडवाले (Playing band) त्यापैकीच एक! करोना काळात लग्नसमारंभांवर (Wedding Ceremony) अनेक बंधने आली. त्यावर अवलंबून असणारे लॉन्स, मंगल कार्यालयचालक (Marriege Hall manager), आचारी (Chef), सजावटकार यांच्यासोबतच बँडपथकातील वादकांच्या रोजीरोटीवरही गदा आली.

हंगामी मागणी जास्त असलेला आणि त्यावरच संसाराचा आर्थिक गाडा अवलंबून असलेल्या या कलाकारांना रोजीरोटीसाठी पर्यायी मार्ग शोधणे (Finding Alternative Ways) गरजेचे होते. हातावर हात ठेऊन स्वस्थ न बसता त्यांनी मार्ग शोधला आणि थांबलेला उत्पन्नस्रोत सुरु करण्यात त्यांना यश मिळाले.

नाशिकमधील (Nashik) काही बँडपथकांतील (Band Artist) कलाकारांनी प्रसंगी भाजीपाला, फळविक्री केली. ज्यांच्याकडे थोड्या फार प्रमाणात भांडवल होते अशांनी किराणा दुकाने सुरू केली. काहीना हेही शक्य झाले नाही. त्यांनी १००-१०० रुपयांच्या शिल्लकवर रिक्षा चालवली. कोणी बांधकामांवर मजुरी करीत आहेत. नाशिकरोडच्या एका बँडवादक कलाकाराने स्नॅक्स बनवण्याच्या कौशल्यातून फास्ट फूडचा व्यवसाय सुरू केला.

येणाऱ्या पैशातून भांडवलात भर टाकून घरपोच अन्नपदार्थ पुरविण्याची सुविधा सूरु केली. दुसऱ्या एका वादकाने भाजी-फळविक्री केली. काम नेहमीपेक्षा वेगळे असले तरी त्यातून पैसा कमावणे हे उद्दिष्ट साध्य करायचे होते. बँडचा धंदा सुरू होता, तेव्हा दिवसाला त्यांना हजार-बाराशे उत्पन्न मिळत असे.

आता दोनशेचा भाजीपाला आणल्यावर सर्व खर्च जावून हातात पन्नास एक रूपये येत होते. पुन्हा माल आणणे आणि घरात खर्चायला पैशांची जुळवाजुळव करणे कठीण जात होते. तरीही या व्यवसायातसुद्धा त्यांना सूर गवसला. बँड वाजवण्याची कला धरुन उपाशी राहण्यापेक्षा जमेल तो, जमेल तसा मार्ग स्वीकारून परिवाराचे पोट भरण्याचे नवे ध्येय समर्थपणे पुढे नेणे त्यांना महत्त्वाचे होते.

कालपर्यंत कलाकारीतून दोन पैसे मिळायचे. त्याचा आनंद होताच, पण आज उदरिर्वाहासाठी स्वीकारलेल्या नव्या जोडधंद्यातूनही ते गरजेपुरता पैसा कमावत आहेत. पूर्णतः नवी सुरूवात होती. अनुभव नसल्याने सुरुवातीला काहीच धंदा झाला नाही. असे बऱ्याचदा घडले, पण शेवटी बँड वाजवणारा हाही कलाकारच! त्याने जीवनाची कलाकारीसुद्धा संयमाने निभावली.

पर्यायी मार्ग

भूक लागते तेव्हा आपण कोण आआहोत यापेक्षा भूक भागवण्यासाठी जगण्याचा नवा मार्ग स्वीकारावा लागला. या परिस्थितीत माझी दोन बँडपथके बंद झाली. नवा मार्ग म्हणून छोटे किराणा दुकान सुरू केले.

परिवाराचा उदरनिर्वाह त्यावरच होतो. आता करोना संकट लवकर टळो आणि आम्ही पूर्ववत आमच्या बँडचा व्यवसाय करू शकू, याच आशेवर आजही टिकून आहोत. त्यासाठी सरकारचीही आर्थिक मदत नको; फक्त बँड व्यवसायाला कमी लोकांत परवानगी दयावी.

- अंबादास अहिरे, बँड व्यावसायिक.

कलेनेच सावरले

अनेकांनी कुठलीही लाज न बाळगता भाजी विक्री ते मजुरी असे जे जमेल ते केले. मला ते जमले नाही, पण माझ्यातील बँडवादनासोबतच्या स्नॅक्स बनवण्याच्या उपजत कलेतून परिवाराचा उदरनिर्वाह सुरु केला. भांडवल कमी होते. त्याला मित्रांनी हातभार लावला.

कोणाकडून भांडी तर कोणाकडून जागा मिळाली. नवी संधी शोधली. वेळ पडली तेव्हा घरपोचही पदार्थ पोहचवले. आजवर बँड वाजून मनोरंजनातून पोटात उतरायचो. आता पोटातून मनात, पण कलाकारी आणि कलेवर आजही जिवंत आहे.

- दिलीप मरसाले, बँडपथक व्यावसायिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com