सावधान! ऑनलाईन गंडा घालण्याचा नवा प्रकार आला समोर, जाणून घ्या

सावधान! ऑनलाईन गंडा घालण्याचा नवा प्रकार आला समोर, जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सध्या ऑनलाईन शॉपिंगवर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सायबर फ्रॉड (Cyber Fraud) करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर खरेदी करणाऱ्यांची संख्याही तेवढीच मोठी असल्याने सायबर फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगारांचे जाळे ही तितकेच मोठे आहे.

विविध शॉपिंग साईट्सवर (Online Shopping Sites) अशा सायबर फ्रॉड करणाऱ्यांचे सतत लक्ष असते, त्यात ते ग्राहकांना अनेक प्रकारांनी गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. असाच गंडा घालण्याचा नवा प्रकार आता समोर आला असून नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

सध्या ग्राहकांना मिशो कंपनीच्या नावाने कुपन पाठवून तसेच कॉल करून आपल्याला कुपन लागले असून सदरचे कुपन स्क्रॅच करून तो नंबर आम्हाला पाठवा किंवा आपल्याला आलेल्या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरून तो कुपन कोड टाका असे म्हणून मेसेज तसेच लिंक व कॉल नागरिकांना येत आहेत.

तरी सदरचे मेसेज /कॉल मिशो कंपनीचे नसून फेक व फसवे असून नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सावधान! ऑनलाईन गंडा घालण्याचा नवा प्रकार आला समोर, जाणून घ्या
Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com