जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

रसायनांचा वापर न करता घर करा स्वच्छ !

करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता घर साफसफाई करताना विशेष काळजी घ्यावी. घरातील वारंवार स्पर्श होणारे दारे-खिडक्यांचे हॅण्डल, विजेची बटणे, शो-केस, टेबल आदी स्वच्छ करण्यासाठी विशेष सॅनिटायझर वापरण्याची गरज नाही. घरातील डिटर्जंट पाण्यात मिसळूनही या वस्तू साफ करता येतात. घरात जितकी स्वच्छता ठेवाल, तितका संसर्ग टाळता येईल.

काही गोष्टी हाताने साफ करणे शक्य होते. पण काही ठिकाणी हाताने स्वच्छता करता येणे अवघड ठरते. कार्पेट, पलंगाखालची जागा, खिडक्या, ग्रिल्स व इतर कोपर्‍यांमध्ये व्हॅक्युम क्लीनर वापर उपयुक्त ठरू शकतो. स्प्रे मॉपचा वापर करून फरशी चकचकीत स्वच्छ करता येईल. नव्या प्रकारचे स्प्रे मॉप्स हातात सहज धरता येण्यासारखे असल्यामुळे हात खराब करण्याची गरज नाही.

व्हॅक्युम क्लीनर्समध्ये यूव्ही सॅनिटायझर्सचा पर्याय आहे. रसायनांचा वापर न करताही घर काही मिनिटांत जंतूमुक्त आणि चकचकीत करता येते. मात्र, असे सॅनिटायझर्स व्हॅक्युम क्लीनरवर बसवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉ. अरुण गुंजाळ

Deshdoot
www.deshdoot.com