जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

भाजी घरी आणल्यावर कशी काळजी घ्यावी ?

बाजारात कुठलीही भाजी असो ती बर्‍याच जणांनी हाताळलेली असते. त्यामुळे भाजी घरी आणल्यावर सर्वप्रथम भाजीची पिशवी सॅनेटाईज करावी. घरातील इतर व्यक्तीने गॅसवर पाणी उकळत ठेवावे. हाताला चटका सहन होईल इतकेच पाणी गरम करावे. त्यात बाहेरून आणलेल्या भाज्या टाकाव्या. या भाज्या सुमारे पंधरा मिनिटे तशाच गरम पाण्यात ठेवाव्यात.

नंतर भाजी गरम पाण्यातून काढून वापरावयास घ्यावी. पंधरा मिनिटे गरम पाण्यात राहिल्याने भाजीवर बसलेले सर्व सूक्ष्मजंतू मरण पावतील व स्वच्छ भाजीचा आपण आस्वाद घेऊ शकतो. भाजी आणलेलीपिशवी साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवावी व नंतर धुवून टाकावी.

डॉ. राजेंद्र खरात

Deshdoot
www.deshdoot.com