जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

बाहेर जाताना गॉगल लावावाच!

डोळे हे शरीराचा महत्त्वाचा अवयव आहेत. कोविडचा प्रादुर्भाव शरीराच्या तीन अवयवांद्वारे होतो. डोळे, तोंड आणि नाक. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर डोळ्यांना नंबर नसेल तर किमान बाहेर जाताना डोळ्यांवर झिरो नंबरचा चष्मा अथवा गॉगल वापरणे गरजेचे आहे.

नंबरचा चष्मा असल्यास प्रश्नच येत नाही. मात्र चष्म्याला सारखा हात लावू नये. चष्मा निर्जंतूक करून डोळ्यांवर ठेवावा. सॅनिटायझरमुळे चष्म्याच्या फ्रेमवर दुष्परिणाम होतात. त्यामुळे शक्यतो चष्म्याच्या काचा साफ करण्यासाठी मिळणार्‍या चांगल्या प्रतीच्या रसायनाचा वापर करावा.नाक आणि तोंडाचा मास्क जसा वापरला जातो तसा डोळ्यांसाठी गॉगल बंधनकारक ठेवावा.

मिलिंद देशपांडे

Deshdoot
www.deshdoot.com