जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

रोज कोमट पाणी प्यावे

करोनापासून संरक्षण म्हणून सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क घालणे हे उपाय आपण करतो. त्याच सोबत प्रत्येकाने रोज कोमट पाणी प्यावे. थंड पाणी पिणे टाळावे. कोमट पाणी पिऊन गळा ओला ठेवावा. करोना संकटच नव्हे तर पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतुत गरम पाणी पिणे शरीरासाठी उत्तम असते.

करोनाचा संसर्ग डोळे नाक व तोंड म्हणजे घशाद्वारे होतो. करोनाचा विषाणू घशात व नाकात राहतो. तेथून पुढे तो श्वासोश्वास व फ्फुफुसांवर आघात करतो. त्यामुळे गरम पाणी पिल्यास श्वसन व अन्न नलिकेतील विषाणू नष्ट होतात.

गरम पाणी पितांना एकदम न पिता घोट घोट प्यावे. गरम पाण्यात हळद घालून पिल्यास अधिक फायदेशीर ठरु शकते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे. फक्त करोना संकट म्हणून नव्हे तर आरोग्य उत्तम ठेवण्याचा मंत्र म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे.

डॉ.निलेश भामरे

Deshdoot
www.deshdoot.com