जगण्याचे नवे तंत्र

जगण्याचे नवे तंत्र

सणांच्या काळात खरेदी करताना !

सणांचा काळ आहे. या काळात खरेदीसाठी घराबाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तीऐवजी कुटुंबातील प्रौढ व्यक्तीस पाठवा. कुटुंबातील सर्व सदस्यांना खरेदीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. घराबाहेर पडताना शक्यतो अंगभर कपडे घाला. पैसे ठेवण्यासाठी नेहमी एकच पाकीट वापरा. आपल्या पाकिटातील पैसे वगळता, क्रेडिट कॉर्ड्स, नाणी व इतर वस्तू घरातच ठेवा.

प्रत्येक वेळी जेव्हा आपण खरेदी करायला बाहेर पडाल तेव्हा त्याच शॉपिंग बॅगचा वापर करा. बाहेर पडताना आपलं वैयक्तिक वाहन वापरा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा. घरी परत आल्यावर आपले बाहेर फिरताना घातलेलेक पडे इतर कपड्यांमध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर कपडे धुवायला टाका. साबण किंवा सॅनिटायझरने सुमारे ३० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ करा.

हात स्वच्छ धुतल्यानंतरचघरातील इतर वस्तूंना स्पर्श करा. आपण आपला मोबाइल फोन आपल्यासोबत घेतला असल्यास तो सेनिटायझरने स्वच्छ करा. जीवनावश्यक गोष्टी आणण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावंच लागतं. परंतु आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

डॉ. अरुण गुंजाळ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com