जगण्याचे नवे तंत्र

जगण्याचे नवे तंत्र

लहान मुलांची काळजी कशी घ्याल?

करोना काळात लहान बालकांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. लहान मुलांचे होम आयसोलेशन कठिण असते. तरीया परिस्थितीत १२ वर्षांखालील मुलांना शक्यतो घराबाहेर काढूच नये. खूपच आवश्यक असेल तर, मास्क घालून व पूर्ण सॅनिटाईझ करूनच पाठवावे.

ज्यांना सर्दी व खोकला आहे, त्यांच्यापासून बालकांनादोन मीटर तरीदूर ठेवावे. नेहमी गरम पाणीच पाजावे. मास्क कटाक्षाने वापरलाच पाहिजे. तसेच मोसंबी, संत्री व अन्य फळे मुलांना खायला द्यावी. त्यासोबतच थोडेफार ड्रायफ्रुटस् देखिल देणे आवश्यक आहे.

बालकांना थोडी जरी सर्दी वा खोकला जाणवला तर डॉक्टरांकडे दाखवावे. नवजात बालकांसाठी त्यांच्या आईने अंगावरचे दुध पाजावे. आई करोना पॉझिटिव्ह असली तरी अंगावरचे दुध पाजणे गरजेचे आहे. कारण आईच्या दुधातूनच बाळाला पाहिजे ते न्यूट्रिशियन्स व घटक मिळतात. फक्त दूध पाजताना आईने मास्क घालावा व हात सॅनेटाईझ करावे.

डॉ. पंकज गाजरे, नवजात बालरोग तज्ज्ञ , Nashik

Deshdoot
www.deshdoot.com