जगण्याचे नवे तंत्र

जगण्याचे नवे तंत्र

करोना काळात काय खावे ?

करोना हा आजार संसर्गजन्य आहे. त्यात पावसाळ्याचा कालावधी हा रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढवण्याचा कालावधी आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. ते कुठे तयार होतात हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. घरात राहणार्‍या लोकांनी आपल्या खाण्यावर काही बंधने ठेवणे गरजेचे आहे.

दिवसातून तीनवेळा खाणे योग्य आहे. सकाळी अल्पोपहार, दुपारी जेवण व रात्रीचे जेवण, काही वेळा संध्याकाळी हलका असा आहार घ्यावा. शक्यतो आठवड्यातून एक-दोन वेळा उपवास करावा. यावेळी राजगिरा, शिंगाडा, भगर व खजूर या पदार्थांचा वापर करावा. हे पचायला हलके पदार्थ आहेत. आपल्या आहारात भात, पोळी, उसळ, भाकरी यांचा समावेश ठेवावा.

शक्यतो मांसाहार टाळावा. कच्च्या भाज्या खाऊ नयेत. फळ खाताना त्यांची साल काढून खावे. तळलेले पदार्थ शक्यतो दिवसा खावे.रात्री खाऊ नये. हळद व सुंठ टाकून दूध घेणे स्वास्थ्यासाठी चांगले आहे. थंडीमुळे पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे कोमट पाणी प्यावे. सूप, डाळ कढण यांचा वापर करावा. शरीरात असलेले पाणी शोषून घेणारे ब्रेड, साबुदाणा शक्यतो टाळावे.

कुंदा महाजन, न्यूट्रिशियन कन्सल्टंट

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com