जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना...

बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तथापि शक्यतो बाहेरचे पदार्थ न खाणेच सध्या बरे आहे. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरचे ताजे पदार्थच उपयुक्त ठरतात. सध्याच्या काळात शक्य असेल तर पाण्याची बाटलीदेखील घरूनच भरून न्यावी.

अगदीच बाहेर खाण्याचा प्रसंग आलाच तर ज्या ठिकाणी खाणे गरजेचे आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय खाऊ नये. तिथली साफसफाई, सोशल डिस्टन्सिंग याबाबतची माहिती घेऊनच खायला पाहिजे. त्यातही शक्यतो हलके पदार्थ खावेत. यामुळे पोटालाही त्रास होणार नाही.

शरीरही स्वस्थ व सशक्त राहील. भाज्या आपण घरी आणतो त्याही स्वच्छ पाण्याने धुवून वापराव्यात. त्याचप्रमाणे घरातील ताट व इतर सर्व वस्तूदेखील अत्यंत बारकाईने स्वच्छ धुवून मगच त्यांचा वापर करावा.

डॉ. रविभूषण सोनवणे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com