जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

मास्कचा वापर व विल्हेवाट !

मास्कचा वापर व विल्हेवाट कोणत्याही रोगी व्यक्तीच्या श्वसन अगर थुंकिद्वारे विषाणुचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ शकतो. तसे होऊ नयेयासाठी अनेक पुर्वीपासून आरोग्य क्षेत्रात मास्कचा वापर केला जातो.करोना नंतर मास्क वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

आरेाग्य क्षेत्रासाठी तीन लेअरचा मास्क, सामान्यनागरीकांसाठी कापडी मास्क असला तरी चालते. मास्क केवळ तोंडावर न लावता त्याव्दारे नाक, तोंड पुर्ण झाकले जाईल असा तो असला पाहिजे. कामकाज तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क नाकाच्या खाली घेतला जातो हे पूर्णतः चुक आहे. तसेच तो वापरण्याबाबतही बंधने बाळगली पाहिजेत. ए

क दिवस वापरलेला मास्क दुसर्‍या दिवशी वापरू नये, तो त्वरीत धुऊन निर्जंतुक करून घेणे व नंतर वापरणे आवश्यक आहे. रूग्णालये तसेच आरोग्य वापर करणारे त्याचा मेडिकल वेस्ट म्हणुन विल्हेवाट लावतात. परंतु सर्वसामान्य नागरीकांनी तो तसाच फेकुन न देता तो निर्जंतूककरून जाड कागदात बांधुन नंतरच घंटागाडीत टाकावा.

वैद्य तेजश्री मुळे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com