जगण्याचे नवे तंत्र

जगण्याचे नवे तंत्र

दागिने कमीच घालावेत ...!

सद्यस्थितीत सामाजिक जीवनात वावरताना अनावश्यक दागिने परिधान करणे योग्य नाही. वैयक्तिक स्वच्छता हा करोनाचा संसर्ग टाळण्याचा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. आपण बाहेरून घरी परत आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुतो. त्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर वापरतो. परंतु आपण परिधान केलेले दागिने दरवेळी रसायनांनी धुणे शक्य होईल का? त्यामुळे या काळात खूप दागिने परिधान करणे टाळावे.

तथापि जे थोडेफार दागिने आपण रोज वापरत असू ते देखील बाहेरून घरी परत आल्यावर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. दागिने कमी घालण्याचा आणखीन एक फायदा आहे. करोनामुळे प्रत्येक माणूस आर्थिक अडचणीत आहे. सध्या गळ्यातील साखळी, मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यापेक्षा दागिने कमीत कमी घालणेच सर्वांच्या हिताचे आहे.

डॉ. जगदीश कागदे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com