जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

शेतकरी भाजीपाला मार्केट मध्ये घेऊन जातांना

दैनंदिन भाजीपाला, फळे, धान्य घेऊन शेतकरी रोज मार्केटमध्ये जात आहेत. शेतकर्‍यांच्या वाढत्या गर्दीमुळे मार्केटमध्ये गर्दी असते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतः नियमित सॅनिटायझर व मास्क वापरावा. पाणीही सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

दिवसभर मार्केटला थांबायचे असेल तर जेवणाचा डबाही घेऊन जावा. व्यापारी बांधवांनीही वरील काळजी घ्यावी. कमी कालावधीत लिलावाची प्रक्रिया पार पडून आर्थिक व्यवहार तत्काळ पूर्ण करून योग्य ते नियोजन करून काळजी घेणे आवश्यक आहे.

शेतकरी, व्यापारी व बाजार समितीमधील सर्व घटकांनी सुरक्षितेची काळजी घेतली तर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी बांधवांना, व्यापार्‍यांना आणि संबंधित सर्वच घटकांना मार्केटमध्ये जाऊन दैनंदिन व्यवहार करणे सोयीचे होईल.

भारत दिघोळे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com