जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

मधुमेही रुग्नांनी वेळापत्रक कसे पाळावे ?

ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असे सरकारने सुचवले आहे. तथापि मधुमेही आणि रक्तदाबाचात्रास असणार्‍या व्यक्तींना व्यायाम आणि आहाराचे पथ्य बंधनकारक असते.

अशा वेळी त्यांनी आपल्या इमारतीच्या गच्चीवर किंवा खाली पार्किंग मध्येअर्धा तास फिरावे. किंवा सकाळी लवकर रस्त्यांवर जास्त माणसे नसतात तेव्हा मास्कलावून फिरायला जावे. कोणी भेटले तरी शक्यतो बोलणे टाळावे. किंवा बोलताना सहा फुटांचे अंतर ठेवावे. फिरणे नाही जमले तर घरी योगासनेकरावीत.आहाराच्या सवयी बदलू नयेत.

व्यायाम कमी होत असेल तर आहारही हलका ठेवावा. हा झाला सामान्य सल्ला. पण व्यक्तीनुसार आहाराचीपथ्ये बदलतात. त्यामुळे व्यायाम कमी होत असेल तर तज्ञांनाभेटून त्यानुसार आपल्या आहारात बदल करावेत. परस्पर बदल करू नयेत.

डॉ. शीतल कर्णावट

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com