जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

नाशिक । डॉ. दीपिका मोरे Nashik

सर्व प्रथम सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मार्केट परिसरात किंवा लोकांच्या संपर्कात येताना सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. लक्षणें नसून देखील बर्‍याच जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे व प्रतिकारशक्ती कमी असणारे लोक देखील बाधित होऊ शकतात.

त्यामुळे लोकांशी संपर्क करणे जेवढे शक्य होईल तेवढे टाळावे. यासोबतच ज्या कुटुंबामध्ये बाधित रुग्ण आढळला आहे अशा परिवाराकडे दुर्लक्ष न करता सर्व दक्षता घेऊन शक्य तेवढी त्यांना मदत करावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपण ज्या व्यक्तींना भेटतो त्याची डायरीत नोंद करावी. त्याची प्रशासकीय यंत्रणेस मदत होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com