नवीन साठवण बंधारे, लघु पाटबंधारे कामे मार्गी लावणार - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कळवण-सुरगाणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद सोहळा
नवीन साठवण बंधारे, लघु पाटबंधारे कामे मार्गी लावणार - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

सप्तशृंगीगड | प्रतिनिधी Saptshrungi Gad

जनतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस NCP सातत्याने करत असून सुरगाणा - कळवण surgana - Kalwan विधानसभा आमदार नितीन अर्जुन पवार MLA Nitin Pawar हे विकासकामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही गेले दोन वर्षे कोविड मुळे विकासकामे रखडली ही वस्तुस्थिती असली तरी आता ती सर्व कामे मार्गी लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Water Resources Minister Jayant Patil यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रे निमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे उपस्थितीत कळवण-सुरगाणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता संवाद सोहळा पार पडला त्यावेळी पाटील बोलत होते.

व्यासपीठावर आमदार नितीन पवार,जिल्हा परिषद सदस्य जयश्री ताई पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सप्तशृंगी शहर अध्यक्ष शांताराम सदगीर,अजय दुबे,दीपक जोरवरकर, दिलीप बर्डे,दत्तू बर्डे,विष्णू सावंत यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आई सप्तशृंगी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या अनुषंगाने सप्तशृंगी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी नामदार जयंत पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी सप्तशृंगी पायथ्याशी असलेले नांदुरी गावातील भौरी नाला येथील पाझर तलावाचे एम.आय.टॅंक मध्ये रूपांतर व्हावा यासाठी सप्तशृंगीगड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार,ग्रा.सदस्य संदीप बेनके,धनंजय गायकवाड,मधुकर गवळी,जीवन पवार,छगन जाधव,यांनी निवेदन देण्यात आले.

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी कळवण - सुरगाणा तालुक्यातील रखडलेल्या वळण योजना नवीन साठवण बंधारे लघु पाटबंधारे कामे मार्गी लावले जातील तसेच स्थानिक जनतेला धरणातील पाण्याचे आरक्षण दिले जाईल असे सांगितले.भाजप सरकार राज्यातील शासनातील मंत्रांना बदनाम करण्यासाठी ईडीचा गैरवापर करत असून असेच छगन भुजबळ यांच्याबाबत केले परंतु न्यायालयाने भुजबळ यांना निर्दोष सिद्ध केले.भाजप विकासावजी सुडाचे राजकारण करत आहे असा आरोप केला.

पूर्वी काँग्रेस सोबत आघाडी होतीच आता शिवसेना राज्यातील सत्तेत सोबत आहे सर्वांनी एकत्र येत लढले पाहिजे असा मतप्रवाह आहे तरीही सर्वांनी बूथ पातळीवरून पक्षाचे मजबूत संघटन करावे स्वतःची मजबूत ताकत उभी करावी व पुढील सर्व निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन पाटील यांनी केले.राज्यातील साखर उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना आमदार पवार यांचे नेतृत्वाखाली पवार परिवार आदर्शवत वाटचाल करत असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा कळवण-सुरगाणा तालुक्यात विकास कामाची मोठी तरतूद करण्यात येईल व कळवण सुरगाणा तालुक्यात विकास होणार तसेच पाऊस उघडताच सर्व रस्त्यांची कामे होतील असे आमदार नितीन पवार यांनी सांगितले सांगितले.

प्रारंभी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,नितीन पवार,जयश्री ताई पवार यांनी कळवण - सुरगाणा तालुक्यातील सर्व कार्यकारिणीची हजेरी घेतली .पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष,शहर अध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष,कळवण - सुरगाणा युवक तालुकाध्यक्ष, आदी विविध सेलच्या तालुकाध्यक्ष यांनी कार्यकारिणीचा आढावा दिला. यावेळी कळवण - सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यकारणीची मिटिंग

राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जणू आज कळवण तालुक्यात राष्ट्रवादी च्या विविध सेलच्या कार्यकारिणीची शाळा व कार्यकारिणीची हजेरी घेतली किती पदाधिकारी अनुपस्थित याची नोंद घेतली तर काही पदाधिकाऱ्यांना आपले पद कोणते हे विचारत उलटतपासणी केली. तपासणी करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी हितगुज करत बूथ कार्यकर्ता किती महत्वाचा आहे हे सांगत कळवण तालुक्यात आमदार नितीन पवार यांचे कौतूक करत वेगळीच छाप पाडली.

Related Stories

No stories found.