शिफारशी देण्याबाबत नवीन नियमावली

शिफारशी देण्याबाबत नवीन नियमावली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने construction department of Zilla Parishad मंजूर केलेल्या कामांच्या शिफारशी work recommendations देताना आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली आहे.

समितीचे सचिव सुरेंद्र कंकरेज यांनी कामे वाटप समितीच्या Works Allocation Committee बैठकीनंतर शिफारशी देण्याबाबत नवीन नियमावली तयार केली आहे.यामुळे आता यापुढे एकाच कार्यालयात शिफारशी घेण्यासाठी होणारी गर्दी टळून कामांचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होणार आहे.

या नवीन नियमावलीनुसार आता यापुढे संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी विहित नमुण्यात पत्र दिल्यानंतर सर्व शिफारशी या त्या त्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात येणार आहे.यानंतर त्या त्या विभागातूनच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.

बांधकाम विभागाकडून दहा लाख रुपयांच्या आतील रकमेची प्रशासकीय मान्यता दिलेली कामे काम वाटप समितीमार्फत वितरित करण्यात येतात. यात एकापेक्षा अधिक काम मागणी अर्ज आल्यास सोडत पद्धतीने कामांचे वाटप करण्यात येते. त्यानंतर कामे मंजूर झालेल्या ठेकेदारांची नावे त्या कामांसह फलकावर प्रसिद्ध करणे म्हणजेच शिफारस होय.

कामांचे नाव फलकावर प्रसिद्ध केल्यानंतर संंबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागात निविदा पावती घ्यायची असते. ही निविदा पावती घेण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे काम मंजूर झाल्याचे प्रपत्र दिले जाते, त्यालाच ठेकेदार व प्रशासनाच्या भाषेत शिफारस देणे म्हणतात. त्यानंतर बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेश दिले जातात.

या सर्व बाबींमध्ये निविदा कारकुन टक्केवारी मागत असल्याचे आरोप ठेकेदारांनी केले आहेत. त्यामुळे बांधकाम समिती सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी शिफारशी देण्याबाबत नवीन नियमावली निश्चित केली आहे. त्यानुसुार बांधकाम विभाग एककडून कोणाही ठेकेदाराला यापुढे थेट शिफारस दिली जाणार नाही. त्याऐवजी ठेकेदाराची कामाची कार्यकक्षा असलेल्या कार्यकारी अभियंत्याकडे त्या सर्व शिफारशी एकत्रिपणे दिल्या जातील.

तेथून ठेकेदारांनी त्या शिफारशी ताब्यात घेऊन निविदा पावती घ्यावी लागणार आहे. यामुळे एकाच कार्यालयात शिफारशी घेण्यासाठी होणारी गर्दी टळून कामांचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com