लाॅकडाऊन संपल्यावर ‘आरटीई’च्या नव्या तारखा

लाॅकडाऊन संपल्यावर ‘आरटीई’च्या नव्या तारखा

नाशिक | Nashik

आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत नुकतीच काढण्यात आली.

या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. मात्र, प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार, वंचित गटातील बालकांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश देण्यासाठी सोडतीचे प्रवेश घेतले जात आहेत.

सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा, असे म्हटले होते. मात्र आत्, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्बंध असल्याने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. नाशिकमधील ४ हजार २०० हून आधिक मुलांचा यात समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com