नाशिकच्या उद्योगांना नव्या संधी

नाशिकची आता इलेक्ट्रीकल हबच्या दिशेने वाटचाल
नाशिकच्या उद्योगांना नव्या संधी

सातपूर । रवींद्र केडीया Satpur

ऑटो इंजिनिअरिंग हब असलेल्या नाशिकची ओळख आता इलेक्ट्रीकल हब म्हणून होण्याच्या दिशेने वाटचाल सूरू झालेली आहे.

नाशिक परिसरासाठीच नव्हे तर सभोवतालच्या 5 राज्यांना इलेक्ट्रीकल टेस्टींग सेवा देणारे ‘सिपी आरआय’ प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्पात आहे.

नाशिक जिल्ह्यात 7-8 हजाराहुन जास्त उद्योग कार्यान्वित आहेत. त्यातील 30 ते 40 टक्के उद्योग इलेक्ट्रीकल क्षेत्राशी सलग्न आहेत. त्यात सुमारे 30 ते 40 मोंठे उद्योग आहेत ज्यांच्या माध्यमातून देश विदेशात उत्पादने पाठवली जात आहेत.या उद्यागांच्या स्वत:चे स्वतंत्र उत्पादने असल्याने जागतिक स्थरावर त्यांनी विशेष मागणी दिसून येत आहे.

या उद्योगांच्या उत्पादनांची तपासणी जागतीक स्थरावरुन करण्यासाठी या उद्योगाना सद्य स्थितीत उत्पादने भोपाळ,बडोदा व बंगळूरु येथे पाठवावी लागत आहेत.त्यात कालापव्यासोबतच खर्चही वाढत असल्याने पर्यायाने उत्पादनाचे मुल्य वाढत असते.त्यामुळे स्पर्धात्मक किंमत देण्यात मोठी कसरत होत असते.

नाशिकला सिपीआरआय प्रकल्प कार्यान्वित होण्याने मोठ्याप्रमाणात आर्थिक व वेळेची बचत होऊ शकणार आहे.त्यामुळे स्पर्धेत जास्त कस लावणे शक्य होणार आहे. नाशिकच्या सिपीआरआयमुळे नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व इलेक्ट्रीकल उद्योगांसाठी अतिरिक्त सुविधा होणार असून, या क्षेत्राशी सलग्न शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन व विकासाच्या दृष्टीने नवी संधी निर्माण होणार आहे.

त्यामुळे नाशिकला येणार्‍या काळात इलेक्ट्रीकल क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार असून, इलेक्ट्रीकल क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणात नाशिकला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिपीआरआय बद्दल

केंद्रीय विद्यूत अनुसंधान संस्था (सिपीआरआय) टेस्टींग लॅब च्या उभारणीसाठी सुमारे 100 एकरचा भूखंड आरक्षित आहे. याठिकाणी दोन इमारतींच्या माध्यमातून तपासणी यंत्रणा उभारण्यात येत आहे. पॉवर सबस्टेशनचे काम प्रगती पथावर आहे. पहिल्या टप्पात एनर्जी मिटर, ट्रान्सफार्मर, इन्स्यूलेटेड ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टींग या तपासण्या केल्या जाणार आहेत. दुसर्या टप्पात पॉवर ब्रेकर, केबल्स तपासणी तसेच जादा क्षमतेच्या यंत्रणांची तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

विस्तारिकरणाला संधी

नाशिकला कार्यान्वित असलेल्या काही कंपन्या सुविधेअभावी स्थलांतरीत झाल्या होत्या.तर अनेकांनी विस्तारीकरण करण्याचे थांबवल होते. काहींनी बडोदा नोयडा बंगळुरु येथे विस्तारित करण्यास सूरूवात केली होती. कालांतराने सिपीआरआयची घोषणा झाल्यानंतर मात्र काही उद्योगांनी नाशिकमध्ये विस्तारीकरणाला गती देत मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीला गती दिल्याचे चित्र आहे. चायनातील वादानंतर उद्योगांना नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com