मनपा विद्युत विभागाचा अजबच गोंधळ

नवीन नाशिक विभागीय कार्यालयात दिव्याखाली अंधार
मनपा विद्युत विभागाचा अजबच गोंधळ

नवीन नाशिक | प्रतिनिधी

संपूर्ण नाशकात एलईडी लाईट लागत असताना नवीन नाशिक विभागामध्ये विभागीय कार्यालयातच जुने सोडियम लाईट कार्यान्वित असल्याने दिव्याखालीच अंधार दिसून आला आहे...

नवीन नाशिक तसेच नाशिकमध्ये मनपातर्फे संपूर्ण ठिकाणी जुने सोडियमचे पिवळ्या रंगाचे लाईट काढण्यात आले. लाईट बिल बचतीसाठी नवीन एलईडी लाईट पथदीपांवर लावण्याचा एक भलामोठा ठेका देण्यात आला.

मात्र, खुद्द नवीन नाशिक विभागीय कार्यालयात असलेले पथदीपावरील लाईट हे सोडियमचे पिवळ्या लाईट अद्याप पर्यंत कार्यान्वित आहेत.

यामुळे नवीन नाशिक करांमध्ये मनपाच्या विद्युत विभागाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. विभागीय कार्यालयात अद्याप पर्यंत हे लाईट बदलले गेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत नवीन नाशिक विभागीय अधिकारी काही कारवाई करतील का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

नवीन नाशकातील इतरत्र जुने एलईडी बदलण्याची घाई मनपाने केली मात्र स्वतःच्या कार्यालयातील लाईट का बदलले नाही असा सवाल नवीन नाशिककरांनी उपस्थित केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com