नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

प्रभाग क्र. २७ येथील दातीर नगर, काकडे महाराज आश्रम व पाण्याच्या टाकी मागील परिसर गेल्या १० ते १५ वर्षा पासूनचा प्रलंबित रस्त्याचा कामाचा प्रश्न नगरसेवक राकेश दोंदे यांच्या प्रयत्नातुन सोडविण्यात आला.

सुमारे दीड कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उदघाटन प्रभागातील जेष्ट महिला व पुरुष यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी राहुल राज केदारे, रवींद्र बोरुंडे, शिवाजी तळेकर, नाना नेटवाटे, कमलाबाई जाधव, मंगल पाटील, सविता अहिरे, राहुल दोंदे ,संदीप धुरंदर आदींसह प्रभागातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.