‘एमपीएससी’ची नवीन गुणपद्धती

एमपीएससी परीक्षा
एमपीएससी परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससीने) नवीन गुणपद्धती जाहीर केली आहे.

एमपीएससीकडून घेतल्या जाणार्‍या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तराबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मकता गुणांची पद्धत होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता चार चुकीच्या उत्तराबददल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पध्दत सन 2009 मध्ये प्रथमतः लागू करण्यात आली.

त्यानंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपध्दती काही बदलासह अवलंबिवण्यात आली. या कार्यपध्दतीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता यापूर्वी अवलंबविण्यात येत असलेल्या सर्व कार्यपध्दती अधिक्रमित करुन यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येणार आहे.

(1) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

(2) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25 % किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येईल.

(3) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही तो अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

(4) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही. ही कार्यपध्दती आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरीता लागू राहील. या कार्यपध्दत यापुढे जाहीर होणार्‍या सर्व लेखी परीक्षांच्या निकालाकरीता लागू राहील.

(5) आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत उपरोक्त कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com