New living techniques
New living techniques|जगण्याचे नवे तंत्र : नखांची योग्य काळजी घ्या
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र : नखांची योग्य काळजी घ्या

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

करोनाचा संसर्ग होण्यामध्ये आपले हात महत्वाची भूमीका बजावतात. ज्या ठिकाणी करोना रूग्णाने हात लावला असेल अशा ठिकाणी चुकून आपला हात लागतो. तोच आपण नाकास किंवा तोंडास लावल्यानंतर आपणास संसर्ग होतो. यासाठी हाताची अधिकाधीक स्वच्छता आपण करत आहोत.

परंतु कसेतरी सॅनिटायझर हातावर ओतून मोकळे व्हायचे, साबन वेडा वाकडा चोळायचा की झाली स्वच्छात, इतक्या निष्काळजीपणे आपण हाताची स्वच्छता करत असतो, तर नखांची स्वच्छता किती होत असेल हे न विचारलेलेच बरे. कोणत्याही ठिकाणी हात टेकल्यानंतर पहिला स्पर्श नखांजवळील भागाचा होतो.

जर त्यांची योग्य काळजी, स्वच्छता केली नाही तर हात धुऊनही संसर्गाचा धोका असतोच. प्रामुख्याने लहा मुले व वृद्ध व्यक्तींना नखे काढता येत नसल्याने त्यांची नखे वाढल्याचे दिसते. यामुळे आपण स्वतसह मुलांप्रमाणेच वृद्धांची नखेही वेळोवेळी काढली पाहिजेत.

त्यांची स्वच्छता केली पाहिजे. प्रामुख्याने महिलांना फॅशन म्हणुन नखे वाढवण्याची हौस असते. त्यात नेलपेंट, नेल आर्ट असे अनेक प्रकार येतात. परंतु अर्धवट किंवा पापुद्रा निघालेल्या नेलपेंटमध्ये व्हायरस लपुन राहू शकतो. यामुळे करोनाचा हा काळ नेलआर्ट करण्याचा नाही हे लक्षात घ्यावे. नखे मोठी होऊ देऊ नयेत. वेळच्या वेळी काढावीत. लहान नखे असतील तरी हात धुताना नखांच्या भागात घासून स्वच्छता करण्याची गरज आहे. नखाची ही गोष्ट लहान, पण खुप मोठी आहे.

- डॉ. प्रणिता गुजराती, जनरल फिजीशियन

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com