‘त्या’ लोकांना युसूफियाकडून नवीन घरे

हाजी मुजाहिद यांचा पुढाकार
‘त्या’ लोकांना युसूफियाकडून नवीन घरे

जुने नाशिक । प्रतिनिधी | Old Nashik

सुमारे दोन महिन्यांपूर्वी द्वारका येथील संत कबीरनगर झोपडपट्टीत (Sant Kabirnagar Slum) घरांना आग लागली होती. या आगीत आठ जळून खाक झाली होती. तर सहा घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या घटनेनंतर युसूफिया फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहिद शेख (Haji Mujahid Sheikh, Chairman of Yousufia Foundation) यांनी दौरा करून हिंदू-मुस्लिम समाजातील (Hindu-Muslim Community) नुकसानग्रस्त लोकांना नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.

ते पवित्र ईद-ए- मिलादुन्नबीच्या (Eid-e-Miladunnabi) पूर्वसंध्येस त्यांनी पूर्ण केले, नव्याने घरे बांधून त्यांंंच्या स्वाधीन करण्यात आले. यांच्या हस्ते पीडित लोकांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आले. तर संसारोपयोगी वस्तू देखील फाउंडेशनतर्फे देण्यात आले.

दरम्यान नवीन घरे बांधून देणे, हा माझा निवडणूक एजेंडा (Election agenda) नाही, असे स्पष्ट केले. मात्र आगामी मनपा निवडणूक (municipal election) गोरगरिबांच्या मदतीसाठी व जुने नाशिकच्या (old nashik) सर्वांगीण विकासासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी माजी नगरसेवक सहाने, सुरेश दलोड, फैज बँकेचे माजी चेअरमन फारुक शेख, युवाशक्ती फाउंडेशनचे इम्तियाज शेख, रफिक हाजी, मुश्ताक करीम आदी उपस्थित होते. कार्यक्रमास हाजी मुबीन शेख, इस्माईल शेख, राशीद खान, नाहीद शेख, अनिस पटेल, जुबेर हाशमी, अ‍ॅड. अन्सार सय्यद, युसूफ खान आदींसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

माणुसकीमुळेच माणसे एकमेकांशी जुळून माणुसकी हिरावल्यास माणसे व जनावरांमध्ये फरक राहणार नाही. म्हणून माणुसकीच्या नात्यानेच आगीत उद्ध्वस्त झालेल्या लोकांना नवीन घरे बांधून देण्याचा वचन मी पूर्ण केला आहे.

- हाजी मुजाहिद शेख, अध्यक्ष, युसूफिया फाउंडेशन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com