बिटको रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बसवली नवीन काच

बिटको रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बसवली नवीन काच

नाशिकरोड । Nashik

येथील बिटको रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर नवीन काच बसविण्यात आली आहे. हे कोविड रुग्णालय असल्याने युध्दपातळीवर हे काम पूर्ण करण्यात आले.

नाशिकरोड येथील नगरसेविकेचे पती राजेंद्र ताजणे यांनी गेल्या आठवड्यात आपली इनोव्हा कार रागाच्या भरात बिटकोत वेगात घुसविल्याने ही काच फुटली होती. काचा उडून किंवा कारच्या धडकेने सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते.

कार मुख्य प्रवेशव्दाराच्या मध्यभागी धडकली होती. शेजारी असलेल्या काचांच्या दुसर्‍या भिंती वाचल्या होत्या. फुटलेली काच मोठी व जाड होती. काचेचे माप घेऊन नवीन काच मुंबईहून मागविण्यात आली. त्यामुळे थोडा विलंब झाला.

ती आल्यानंतर ती बसविण्यास एक दिवस गेला. कारागिरांनी नुकतीच ही काच बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com