व्यसनांमुळे नवी पिढी बरबाद: इंदुरीकर महाराज

व्यसनांमुळे नवी पिढी बरबाद: इंदुरीकर महाराज

लोहोणेर । वार्ताहर | Lohoner

संगणकीय युगात विज्ञानाने (Science) कितीही प्रगती केली असली तरी त्याला अध्यात्मिक जोड दिल्यानंतरच खरी प्रगती साधता येते. येणार्‍या भावी पिढीवर संस्कार (Rites) होत नसल्याने ही पिढी बिघडण्याची शक्यता आहे. मुळात आईने मुलांवर चागले संस्कार केले तरच संस्कार टिकतील. या भवसागरातून तरुन जायचे असेल तर नामाशिवाय पर्याय नाही, असे प्रबोधन निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) यांनी केले.

येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) बोलत होते. आई-वडीलांनी आपल्या मुलांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माची शिकवण द्यायला हवी. हरिपाठ, भजन, कीर्तनाचे धडे घेण्यासाठी बालसंस्कार केंद्रात पाठवावे. जेणे करून भविष्यात आपल्या मात्या-पित्यांचा ते चांगला सांभाळ करतील. आजची तरुण पिढी (younger generation) व्यसनांच्या आहारी जावून कुंटुब उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे तरूण पिढीने वेळीच सावध होवून व्यसनमुक्त जगावे आणि कुटूंबासह देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाईलच्या (mobile) अति व अयोग्य वापरामुळे माणसा-माणसातील संवाद संपुष्टात आला आहे. बलात्कार (Rape), गुन्हेगारीचे (crime) प्रमाण वाढले आहे. संपत्ती व पदावर गर्व करू नका, माणुसकी हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कीर्तनास गायनाचार्य गोकुळ शिंदे, रविराज महाराज जगदाळे, पखवाज वादक सचिन महाराज ह्याळीज, मृदुंगाचार्य गोरख महाराज, तुळशीदास महाराज, सुदाम महाराज, दामोधर महाराज,

हार्मोनियम वादक स्वप्निल महाराज, दीपक आहेर, विणेकरी राजू महाराज व श्री विश्वमाउली वारकरी संस्थेच्या टाळकरी विद्यार्थ्यांची साथ लाभली. पंचक्रोशीतील भाविक कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनासाठी संदीप बच्छाव, आहेर, मयुर सुराणा, राकेश गुळेचा, मयुर देशमुख, राजेंद्र धामणे, जगन बच्छाव, माणिक निकम, पोपट उशिरे, संजय कुराडे आदींसह हनुमान मंदिर सेवेकरी मंडळानी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.