लवकरच रस्त्यावर दिसणार नवीन घंटागाड्या

लवकरच रस्त्यावर दिसणार नवीन घंटागाड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला नवीन घंटागाडीचा (ghantagadi) वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर काम अंतीम टप्प्यात असून केर कचरा (garbage) गोळा करण्यासाठी तब्बल 354 कोटींचा नवीन घंटागाडीचा ठेका पुढील पाच वर्षासाठी देण्यात येणार आहे.

दरम्यान नव्या ठेक्याचे आदेश मिळत नसल्यामुळे जुन्या ठेकेदारांना सतत मुदत वाढ देण्यात येत होती. त्यामुळे जुन्या ठेकेदारांनी आजपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महापालिका प्रशासनाने (Municipal administration) ठेकेदारांना तंबी देताच त्यांनी आज नियमित काम केले आहे. दरम्यान लवकरच नवीन घंटा गाड्या रस्त्यावर दिसणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पावणे दोनशे कोटी वरून थेट 354 कोटींवर गेलेला घंटागाडीचा ठेका चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या ठेकेदारांना कार्य आरंभ आदेश द्यायची बाकी होते. मात्र काही ना काही तांत्रिक अडचणी (Technical problem) निर्माण होत असल्यामुळे तीन तीन महिन्यांची मुदतवाढ जुन्या ठेकेदारांना (contractors) देण्यात येत आहे,

मात्र आता नवीन आदेश द्या नंतरच आम्ही काम करू असा पवित्र जुन्या ठेकेदारांनी घेतला होता तर आज 15 नोव्हेंबर पासून काम बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे असा करता येणार नाही, असे सांगत महापालिका प्रशासनाने लवकरच आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

वादग्रस्त ठेकेदाराचा नाव

घंटागाडीचा ठेका विभागनिहाय देण्यात आला आहे तर शहरातील दोन विभाग एका वादग्रस्त ठेकेदार देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. हा ठेकेदार इतर काही महापालिकांमध्ये ब्लॅकलिस्ट असल्याचे देखील सांगण्यात येते तर नुकताच एका प्रकरणावरून त्याचा नाव चांगलाच गाजला होता, तरीही महापालिकेने त्या ठेकेदाराला घंटागाडीचा ठेका दिल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com