कर सल्लागार संस्थेची नवीन कार्यकारणी जाहीर

कर सल्लागार संस्थेची नवीन कार्यकारणी जाहीर

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

टॅक्स प्रॅक्टिशनरस असोसिएशन नाशिक (Tax Practitioners Association Nashik )यांची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी सुरुवातीला टॅक्स प्रॅक्टिशनर्स सोसिएशन मधील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तचे वाचन संजय सोनवणे यांनी केले त्याला सर्वांनी अनुमती देऊन कायम केले तसेच मागील वर्षातील कामकाजाचा आढावा यावेळी सभासदा समोर सादर करण्यात आला.

यावेळी राजेंद्र बकरे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड केली. विद्यमान अध्यक्ष निवृत्ती मोरे यांनी आपला पदभार नवनिर्वाचीत अध्यक्ष राजेंद्र बकरे यांच्याकडे सोपवला. यावेळी उपाध्यक्षपदी संजय सोनवणे, सचिवपदी अक्षय सोनजे, खजिनदारपदी नितीन फिरोदिया, सहसचिव जावेद अन्सारी, संघटक प्रकाश विसपुते, कमिटी सभासद म्हणून तसेच झुंबरलाल उपाध्ये, नितीन डोंगरे, संदीप गाढवे, मनोज धाडीवाल, रवी चोपडा, निखिल देशमुख, योगेश कातकाडे अनिकेत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि,जीएसटी, आयकर व इतर कायद्यांमध्ये वारंवार बदल होत असतात त्याचे अद्यावत व सखोल ज्ञान कर सल्लागार यांना वेळोवेळी मिळावे याकरता तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून विविध कार्यशाळाचे आयोजन करून प्रत्येक कर सल्लागार हा होणाऱ्या बदलांविषयी नेहमीच अद्यावत राहील हे प्रामुख्याने बघितले जाईल. त्यांच्याकडे असलेला स्टाफ कर्मचारीवर्ग यांच्यासाठी सुद्धा सेमिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.

नवीन विद्यार्थी यांनासुद्धा कायद्याचे प्रशिक्षण देऊन स्वयंम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाईल.याप्रसंगी ज्येष्ठ सभासद व सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला तसेच निवृत्ती मोरे अनिल चव्हाण, रंजन चव्हाण, प्रदीप छत्रिय, सुरेश बोथरा ,सुनील देशमुख, नितीन डोंगरे, योगेश कातकाडे, कमलेश सानप, सचिन येवलेकर आदी सभासदांनी अध्यक्षांचे स्वागत केले. सूत्रसंचालन जयप्रकाश गिरासे यांनी तर आभार संजय सोनवणे यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

Related Stories

No stories found.