शिवसेनेत नवी ऊर्जा!

शिवसेनेत नवी ऊर्जा!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक हा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेला Shivsena परस्परांतील मतभेद, हेवेदावे आणि कुरघोड्यांच्या राजकारणातून ग्रहण लागले होते. परस्परांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करुन एक दिलाने व नव्या दमाने शिवसेना पून्हा एकसघ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

केशवराव थोरातांच्या माध्यमातून शिवसेनेला धडकती तोफ लाभली होती. त्यावेळी छगन भूजबळ, बाबूराव कमोद, कैलास कमोद, काकासाहेब सोलापूरकर यांच्या माध्यमातून शिवसेनेची पाळेमुळे नाशिकला खोलवर रुजली आणि नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला झाला. नाशिकने सेनेला खा.राजाभाऊ गोडसे, खा.उत्तमराव ढिकले, खा.हेमंत गोडसे यांच्या रुपाने लोकसभेचे प्रतिनिधीत्व दिले. याकाळात नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचे मोहोळ उभे राहीले.

नाशिक महापालिकेवर Nashik Municipal Corporation सेनेचा झेंडा सातत्याने फडकवण्यात यश आले. दशरथ पाटील, वसंत गिते, विनायक पांडे यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीतून शहरावर सेनेने पाय घट्ट रोवले होते. दरम्यान पक्षांतील नेत्यांच्या पक्षांतरासोबतच शिवसेनेशी सलग्न पक्ष म्हणून मनसेनेच्या उदयामुळे सेनेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या ‘आऊट गोईंग’चा फटका बसला. दरम्यान पक्षाची ताकद आपोआप कमी होऊ लागलेली होती.

पक्षांतर्गत बेदिली व कोरघोड्यांच्या राजकारणात पक्ष जास्त क्षीण होऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर पक्ष श्रेष्ठींनी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार पक्षातून बाहेर गेलेल्यांची मनधरणी करुन पून्हा त्यांना स्वगृही आणण्यात आले. येणार्‍या निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता स्थापनेला अग्रक्रम देत परस्परांतील हेवेदावे संपूष्टात आणल्याने पक्ष ताकदीने उभा रहात असल्याचे दिसून येत आहे.पक्षाची क्षीण झालेल्या ताकदीला उर्जीतावस्था मिळाली आहे.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेनंतर काही अंशाने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. खा. संजय राउत व भाऊलाल चौधरी यांनी पक्षबांधणीला गती दिली.त्या प्रयत्नांतून शिवसैनिक पुन्हा एकदा पेटून उठल्याचे दिसत आहे. महासभा किंवा आमदारांच्या वादातून सामान्य कार्यकर्त्यांसमोर आक्रमकतेची आग निर्माण करण्यात पदाधिकारी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तळागाळातील सामान्य कार्यकर्ते बूथप्रमुखांची मोट बांधण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे मोहोळ तयार करण्याचे काम गतिमान झाल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com