लॉकडाऊन संपल्यावर आरटीई प्रवेशाच्या नव्या तारखा

लॉकडाऊन संपल्यावर आरटीई प्रवेशाच्या नव्या तारखा

नाशिक । प्रतिनिधी

आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत नुकतीच काढण्यात आली. या सोडतीत 67 हजार 553 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. मात्र, प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वंचित गटातील बालकांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश देण्यासाठी सोडतीचे प्रवेश घेतले जात आहेत. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 30 एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा, असे म्हटले होते. मात्र आता लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील नऊ हजार 432 शाळांतील 96 हजार 684 जागांसाठी तब्बल दोन लाख 22 हजार 029 अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून 67 हजार 553 विद्यार्थ्यांची निवड झाली. नाशिकमधील 4 हजार 200 हून आधिक मुलांचा यात समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com