आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका

आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका

म्हाळसाकोरे। वार्ताहर | Mhalasakore

गोदाकाठ नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी (Health facilities) म्हाळसाकोरे ग्रामीण आरोग्य केंद्राला (Mhalsakore Rural Health Center) अद्यावत रुग्णवाहिका (Ambulance) उपलब्ध झाली असून काल मंगळवार दि.5 रोजी जि.प. सदस्य सुरेश कमानकर, पं.स. सदस्य शहाजी राजोळे यांचेसह ग्रा.पं. सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत म्हाळसादेवी मंदिरासमोर या रुग्णवाहिकेस नारळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.

जि.प. अंतर्गत महाराष्ट्र शासनाने (maharashtra government) नाशिक जिल्ह्यासाठी (nashik district) 32 नवीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. दिडोरी (dindori) लोकसभा खासदार केंद्रीय कुटुंब आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार (Union Minister of State for Family Health Dr. Bharti Praveen Pawar) यांच्या हस्ते सोमवार दि.4 रोजी नाशिक (nashik) येथून हिरवा कंदील दाखवून वितरण करून दिल्या.

जिल्हा परिषदेने (zilha parishad) 15 वर्षावरील जुन्या झालेल्या रुग्णवाहिका बदलण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. यात म्हाळसाकोरे गावची रुग्णवाहिका ही खूप जुनी झाली होती. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

म्हाळसाकोरे आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळावी अशा मागणीचे पत्र जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे दि.20 सप्टेंबर 2021 रोजी पं.स. सदस्य शहाजी राजोळे, जि.प. सदस्य सुरेश कमानकर, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके, शिवाजी सुरासे, म्हाळसाकोरेचे सुधीर शिंदे, सरपंच संजय पडोळ आदींनी दिले होते. या मागणीला यश मिळून नवीन अद्ययावत रुग्णवाहिका म्हाळसाकोरे ग्रामीण आरोग्य केंद्राला मिळाल्याने आपत्कालीन परिस्थितीत या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना मोठी मदत होणार असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी जि.प. सदस्य सुरेश कमानकर, पं.स. सदस्य शिवा सुरासे, म्हाळसाकोरे सरपंच संजय पडोळ, ग्रा.पं. सदस्य संतोष बाजारे, नवनाथ मुरकुटे, दत्तू मुरकुटे, कमलाकर राऊत, जगन ढोबळे, दौलत मुरकुटे, राजेंद्र मुरकुटे, विलास आव्हाड, प्रकाश बाजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक सदगीर, सुपरवायझर पांडूरंग कांडेकर, आरोग्यसेवक राजेंद्र बैरागी, संदीप गवळी, सांडू संसारे, तुषार पगारे, रुग्णवाहिका चालक विक्रम बाजारे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.