नाशिक शहरासाठी निओ टॅपचा वापर अनिवार्य करणार : महापौर

कोविडवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार
नाशिक शहरासाठी निओ टॅपचा वापर अनिवार्य करणार : महापौर
आढावा बैठक

नाशिक । Nashik

शहरात आजमितीस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या दृष्टिकोनातून अतिरिक्त आयुक्त सेवा वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी व विभागीय अधिकारी यांची (दि.१७) रोजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी याबाबतची आढावा बैठक घेतली. यामध्ये दाट वस्तीत प्रादुर्भाव वाढत असल्याने निओ टॅपची मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान निओ टॅपच्या माध्यमातून शहरातील स्लम व दाट लोक वस्तीतील तसेच कामगार आस्थापना मधील नागरिकांमध्ये प्रबोधन व जनजागरण केल्यास व निओ टॅप वापरण्याबाबत सूचना दिल्यास करोनाला अटकाव करण्यास मदत होईल. तसेच तापाचे लक्षण समजणे करिता निओ टॅप हे एक अत्यंत उपयुक्त सरळ व सोपे साधन आहे. ज्यामुळे ताप येणे हे लक्षण वेळीच समजून कोविड - १९ वर नियंत्रण मिळविणे सोपे होईल. या माध्यमातून हॉस्पिटलला माहिती होऊन संबंधित विभागीय अधिकारी यांना देखील त्वरित याबाबतची माहिती होईल. उपचारा संबंधी पुढील कार्यपद्धती करणे सोपे होणार आहे. त्यामुळे त्वरित उपचार व मानसिक आधार मिळण्यास मदत होऊन रुग्ण लवकरात लवकर बरा होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

यासंदर्भात होणाऱ्या खर्चास स्टँडिंग कमिटी मार्फत त्वरित मंजुरी देण्यात येईल असेही माननीय महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केले. निओ टॅप मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये खरेदी करणे बाबत प्रबोधन केले पाहिजे. तसेच झोपडपट्टी विभाग व दाट लोकवस्ती मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून याचे वाटप करण्यात यावी असेही संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com