सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग

सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये नाशिक महानगरपालिका व नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आज (दि. 21) चांडक सर्कल वरून त्र्यंबक नाक्याकडे येणार्‍या रस्त्यावर (नेबरहूड टेस्टिंग) चाचणी घेण्यात आली.

नाशिक शहरात सायकल फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी असा 13 किमी (दोन्ही बाजुने) पॉप अप सायकल ट्रॅक बनविण्याचा प्रस्ताव आहे. हा पॉप अप सायकल ट्रॅक बनवताना या रस्त्या लगत (नेबरहूड) येणार्‍या रस्त्यांवरही सायकल ट्रॅक होणे गरजेचे आहे.

ज्याद्वारे या रस्त्याला लागणार्‍या सर्व रस्त्यांवरून सायकल चालक सुरक्षितरित्या सायकल चालवू शकणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नेबरहूड टेस्टिंग घेण्यात आली. नाशिक स्मार्ट सिटीसोबत नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सदर चाचणीमध्ये सहभागी झाली होती.

या रस्त्यावर सायलिस्ट्सने सायकलिंगच्या दृष्टीने काही अडथळे नोंदवले आहेत. खड्डे तसेच उतार आणि काही ठिकाणी ड्रेनेजच्या ढाप्यामुळे अडथळे येतात. असे निरीक्षण सायकलिस्ट्सने नोंदवले आहे.

नाशिक शहराला इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये पहिल्या 11 शहरांमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकलिंग अवेअरनेस, फ्रीडम राईड, सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे, तसेच पॉप अप ट्रॅकदरम्यान सायकलिस्ट्सना कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी हँडलबार सर्वेसारखे उपक्रमही राबविण्यात आले आणि असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सर्वेक्षणासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे अधिकारी तसेच नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे सदस्य रवींद्र दुसाणे, साधना दुसाणे, चंद्रकांत नाईक, सुरेश डोंगरे, जाकीर पठाण, ऐश्वर्या वाघ, माधुरी गडाख, अदित्य पवार, रोशन केदार, सतीश महाजन उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com