युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्र महत्वाचे व्यासपीठ: भुजबळ

युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्र महत्वाचे व्यासपीठ: भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशातील युवकांना देशाच्या संपूर्ण वाटचालीचा इतिहास माहिती असायला हवा. देशात बहुजन समाजाला (Bahujan Community) शिक्षणाची (education) कवाड खुले करण्यासाठी फुले दाम्पत्याचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे.

त्यामुळे या संधीच सर्व युवक युवतींनी (youth) सोन करावं. प्रथमतः आपल्या आयुष्यातील शिक्षणाचा (education) महत्वपूर्ण टप्पा पूर्ण करावा. कारण जगात सर्वात मोठी कुठली संपत्ती असेल तर ती ज्ञान आहे. ती सर्व युवक युवतींनी आत्मसात करावी असे सांगत युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्र (Youth Center) महत्वाचे व्यासपीठ असल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्र नाशिक (Nehru Yuva Kendra Nashik) आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सव २०२२ (District Level Youth Festival 2022) मेट भुजबळ नॉलेज सिटी (Met Bhujbal Knowledge City) आडगाव, नाशिक येथे पार पडला. या युवा उत्सवाचा समारोप ना. छगन भुजबळ (chagan bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी युवकांना छगन भुजबळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण (Prize distribution) करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, समन्वयक मोहम्मद आरिफ खान, सुनील पंजे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भुजबळ म्हणाले की, जगात सर्वाधिक तरुण (youth) भारतात असून त्यांच्या पर्यंत पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. नेहरू युवा केंद्र (Nehru Youth Centre) हे तळागाळापर्यंत रुजलेले जगातील सर्वात मोठे युवकांचे जाळे आहे. देशात आपत्ती व्यवस्थापनाच्या परिस्थितीच्यावेळी नेहरू युवा केंद्रातील युवकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशाच्या हितासाठी नेहरूंनी आपली संपत्ती देशाला अर्पण केली.

देशाच्या विकासात म.गांधी, नेहरू यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा. देशाला पुढे न्यायचे असेल तर युवकांना देशाचा इतिहास माहिती असायला हवा. कारण देशात एकात्मता ठेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याची सर्वस्वी जबाबदारी युवकाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com