नांदगाव नगरपालिका
नांदगाव नगरपालिका
नाशिक

नांदगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह १३ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

कामकाज पूर्वरत

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव । Nandgoan :

करोना बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन झालेल्या नांदगाव नगरपालिकेतील १३ कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी यांचे करोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःस्वास सोडला आहे. रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले.

गेले चार दिवसापासून कुलूपबंद असलेले नगरपालिकेच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून आज सकाळपासून नियमितपणे कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. येवला येथे वास्तव्यास असलेले नगरपालिकेचे एक कर्मचारी रजा कालावधी संपल्यावर आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आले.

त्यानंतर काही तासांच्या कालावधी नंतर त्यांच्या परिवारातील एक सदस्याचा करोना चाचणी अहवाल बाधित आल्याने सदर कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी त्वरित कोरंटाईन होण्यास सांगितले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतील २३ कर्मचाऱ्यांना कोरंटाईन होण्यास सांगितले होते.

दरम्यान संबंधित कर्मचारी करोना बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या मुख्याधिकाऱ्यासह १३ कर्मचाऱ्याचे स्त्राव बुधवारी घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. सदर अहवाल गुरुवारी उशिरा रात्री प्राप्त झाले असुन सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःस्वास सोडला आहे. यानंतर सकाळी नगरपालिका कार्यालय निर्जंतुक करून चार दिवस कुलूपबंद असलेले कार्यालयाचे कामकाज पुर्ववत सुरू करण्यात आले आहे.

सर्वच कर्मचाऱ्याचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आनंदी असून शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि करोनामुक्त शहर ठेवण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहेत. शहर करोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील मोठे सहकार्य केले असून त्यांचे आभारी आहोत. यापुढे देखील शहर करोनामुक्त ठेवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करू.

- डॉ.श्रेया देवचके, मुख्यधिकारी, नांदगाव

Deshdoot
www.deshdoot.com