NEET SS 2021 : परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

NEET SS 2021 : परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) सुपर स्पेशालिटी २०२१ चे सुधारित वेळापत्रक (Revised Timetable) जाहीर केले आहे…

नीट एसएस २०२१ परीक्षेसाठी (NEET SS Exam) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी नीट एसएस अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरू होणार होती. परंतु काही कारणांमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने अधिकृत वेबसाइट www.natboard.edu.in वर नीट एसएस २०२१ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यासंदर्भतील अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रजिस्ट्रेशन वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपासून १२ ऑक्टोबरला सकाळी ११.५५ पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज सुधारण्यासाठी १६ ते १८ ऑक्टोबरपर्यंत आणि अंतिम अर्ज सुधारणा विंडो २६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

कधी होणार परीक्षा?

नीट एसएस २०२१ परीक्षा दि. १३ आणि १४ नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. याशिवाय एसएस ॲडमिट कार्ड ५ नोव्हेंबर रोजी जारी केले जाणार आहे. नीट एसएस २०२१ कट ऑफ आणि निकाल ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल.

परीक्षा पॅटर्न

सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालय, सशस्त्र बल चिकित्सा सेवा संस्था आणि सर्व डीआरएनबी सुपर स्पेशालिटी कोर्सेसमध्ये (6 वर्षीय डीआरएनबी कोर्स वगळून) प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) असते. परीक्षा एकूण १५० गुणांसाठी आयोजित केली जाते आणि परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com