१२ सप्टेंबरला नीट परीक्षा; ओएमआर शीट जारी

१२ सप्टेंबरला नीट परीक्षा; ओएमआर शीट जारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (neet) परीक्षा येत्या १२ सप्टेंबर रोजी होणार आहे....

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशाच्या नीट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेची नमुना ओएमआर (Optical mark recognition) जारी करण्यात आली आहे.

एनटीएच्या वतीने नुकतेच देशभरातील नीट परीक्षेचे केंद्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र जाहीर केल्यानंतर आता नमुना ओमएमआर जाहीर करून ती कशी भरायची या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

एनटीए परीक्षा (NTA Exam) ऑफलाइन पद्धतीने देशभरातील २०२ शहरांमध्ये होणार आहे. मागील वर्षी करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत १३ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला १३ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते.

त्यापैकी ७ लाख ७१ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलगू उर्दू यांसह एकूण ११ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट यूजी परीक्षा देणारे विद्यार्थी neet.nta.nic.in या संकेतस्थळावर भेट देऊन पीडीएफ स्वरूपातील नमुना ओएमआर पाहू शकतात.

ओएमआरवरील वैयक्तिक तपशील आणि गोल रंगवण्यासाठी काळ्या शाईचा ब्लॅक बॉल पॉईंट पेनचा वापर करावा. उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करू नये. विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलेल्या माहितीशिवाय इतर कोणतीही माहिती भरू नये. खाणाखुणा करू नयेत.

ओएमआरवर दिलेल्या ठिकाणी विहित ठिकाणी नाव भरावे. उत्तर पत्रिकेवरील घोषणापत्राखाली सही करावी. नीट प्रश्नपत्रिकेवरील बुकलेट कोड, बुकलेट क्रमांक नोंदवण्यास विसरू नये. एका उत्तरासाठी अधिक पर्याय नोंदवून नये, अशा विविध मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

९ सप्टेंबरला हॉलतिकीट होणार उपलब्ध

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट यूजी २०२१ परीक्षा १२ सप्टेंबरला होणार असून विद्यार्थ्यांना या परीक्षेचे प्रवेशपत्र ९ सप्टेंबरला उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करून अर्ज क्रमांक आणि पासवर्ड दाखल केल्यानंतर प्रवेशपत्र ओपन होईल. त्यानंतर ते डाऊनलोड करून सोबत ठेवावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com