नीट परीक्षा १२ सप्टेंबरलाच...

नीट परीक्षा १२ सप्टेंबरलाच...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

१२ सप्टेंबरला होणारी नीट (NEET) परीक्षा (Exam) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे. ही परीक्षा सीबीएसई कंपार्टमेंट (CBSE Compartment), खासगी आणि इतर परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने नीट परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण नीट परीक्षा १२ सप्टेंबर रोजी ठरलेल्या तारखेला होईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे....

या याचिकेवर सुनावणी होणार नाही, अनिश्चिततेची परिस्थिती नकोय आणि परीक्षा व्हायला हवी असे या प्रकरणी न्या. ए एम खानविलकर, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले. दरम्यान त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट (NEET) परीक्षेत भाग घेणार आहेत.

काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा टाळता येत नाही. यापूर्वी NEET परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार होती, परंतु करोना (Corona) परिस्थिती पाहता ती पुढे ढकलण्यात आली होती.

नीट यूजी परीक्षा देणारे नोंदणीकृत उमेदवार (Registered Candidates) neet.nta.nic.in वर जाऊन परीक्षा केंद्राचे शहर तपासू शकतील. वैद्यकीय प्रवेश परीक्षा (Medical Entrance Exam) घेतली जाणाऱ्या सर्व शहरांचा NEET 2021 परीक्षा शहरांच्या यादीमध्ये समावेश आहे. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड (Password) वापरून त्यांना निर्धारित करण्यात आलेल्या NEET UG 2021 परीक्षेचे शहर तपासू शकतील.

देशभरातील २०३ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी ९ सप्टेंबर २०२१ रोजी NTA कडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. या परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

NEET परीक्षा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली. याआधी ६ ऑगस्ट २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ही तारीख वाढवून १० ऑगस्ट २०२१ करण्यात आली. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क जमा करण्याची आणखी एक संधी देत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com