डिजिटल शिक्षण पद्धत काळाची गरज : खा. गोडसे

डिजिटल शिक्षण पद्धत काळाची गरज : खा. गोडसे

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

करोना विषाणू Corona Virus घातक असला तरी संकटावर मात कशी करायची हे आपल्याला या महामारीमुळे शिकायला मिळाले. करोनामुळे शाळा Schools बंद करण्यात आल्याने डिजीटल शिक्षण Digital Education पध्दतीचे महत्व समाजाला कळाले. यातुनच ऑनलाईन शिक्षण Online Education पद्धतीचा वेग वाढला. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भारही हलका होण्यास मदत होत असल्याने डिजीटल शिक्षण पध्दत ही आता काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी केले.

नाशिक ग्रामीण युवतीसेनेच्या उपजिल्हाप्रमुख भक्तीअजिंक्य गोडसे यांच्या प्रयत्नातून एकलहरे जिल्हा परिषद गटातील देवळाली कॅम्प व परिसरातील 40 गुणवंत विद्यार्थ्यांसह अंबड येथील श्री सिध्दीविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या Shri Siddhivinayak Disability Rehabilitation Education Institute दहा दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत डिजीटल टॅबचे वाटप येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूल येथे करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना खा.गोडसे यांनी इंडियन बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून पन्नास टॅबची खरेदी करण्यात आली. होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी टॅब उपलब्ध करून द्यावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून भक्ती गोडसे यांनी इंडियन बँक प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले होते. त्या प्रयत्नांना यश येऊन इंडियन बँक प्रशासनाने डिजीटल टॅबसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातूनच 50 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.

यावेळी बँकेचे के.जी.एम. फैजानी, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला, मायाताई शिंदे, अजिंक्य गोडसे, मंगेश कदम, संतोष आहुजा, प्रकाश वैष्णव, जितेंद्र मानकर, संग्राम शिरसाठ, खंडू सांगळे, प्रशांतर मोरकर, मोहनसिंग राठोड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com