निफाड रुग्णालयात बिनटाक्याची शस्त्रक्रिया

निफाड रुग्णालयात बिनटाक्याची शस्त्रक्रिया

निफाड। प्रतिनिधी | Niphad

येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub District Hospital) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) मोफत बिन टाकेच्या (Non Stitch) अपेंडीकस (appendix) या आजाराची शस्त्रकिया यशस्वीपणे (Surgery successful) करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat), निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील राठोर, डॉ.अनंत पवार यांच्या सुचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय निफाड (Sub District Hospital Niphad) येथे प्रथमच अपेंडीकस या आजाराचे बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजीव तांभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले डॉ.समाधान पाटील यांनी सदरील शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

महात्मा फुले योजनेअंतर्गत सदर शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी करण्यात आली आहे. यासाठी भुलतज्ज्ञ डॉ.महेश क्षिरसागर, वैशाली नागरे, स्मिता राजोळे यांनी परिश्रम घेतले. येथील उपजिल्हा रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

यासाठी मुळ रेशन कार्ड (Ration Card) व आधारकार्ड ची नोंदणी (Registration of Aadhaar Card) करिता आवश्यकता असल्याची निफाड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजीव तांभाळे यांनी दिली. गरजू रुग्णांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. तांभाळे, आरोग्य मित्र निकिता तंवर, ऋषीकेश सानप, शुंभम राऊत, नितीन परदेशी यांचेसह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह आरोग्य सेविका आणि कर्मचार्‍यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com