प्रतिभाशील उद्योजक निर्माण होण्याची गरज : भटकर

प्रतिभाशील उद्योजक निर्माण होण्याची गरज : भटकर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

भारत (India) हा खेड्याचा देश असून खर्‍या अर्थाने देश घडवयाचा असेल, तर खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी (mahatma gandhi) यांनी स्वातंत्र्यकाळात दिला. आज स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानंतर साजरा करत असताना सर्वच क्षेत्रात मोठे बद्दल घडून आल्याचे दिसते.

विशेषत: शिक्षण क्षेत्र (education sector) मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. अगदी मंदिरात भरणारी गावातील शाळा (school) आता मोठमोठ्या इमारतीत कॉम्युटरराज्ड झाली आहे. अशा परिस्थितीत चिरकाळ टिकण्यासाठी आव्हाने स्विकारून प्रतिभाशील उद्योजक (entrepreneur) होण्याची गरज असल्याचे प्रतिपाद पद्मभूषण विजय भटकर (Padma Bhushan Vijay Bhatkar) यांनी केले.

मविप्र शिक्षण संस्थेच्या (MVP Education Institute) अभियात्रिकी महाविद्यालयात कॉलेजरोड, गंगापूररोड मित्र मंडळाच्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शिक्षणविश्व व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी एसएमबीटी शिक्षण संस्थेचे विश्वस्थ आमदार डॉ. सत्यजित तांबे (Trustee MLA of SMBT Education Institute Dr. Satyajit Tambe), वेस्टर्न रेल्वेचे मुख्य ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थापक नरेंद्र पाटील (Narendra Patil, Chief Transportation Manager, Western Railway), मर्चंट नेव्हीचे कॅप्टन अतुल इंदूरकर (Captain Atul Indurkar of Merchant Navy) यांची व्याख्याने झाली.

या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, अध्यक्ष योगेश राणे, विश्वस्त योगेश मालपुरे, उपाध्यक्ष संजय दुसे, संजय बागड, सरचिटणीस महेश पितृभक्त आदी उपस्थित होते. भटकर म्हणाले, शिक्षणविश्व झपाट्याने बदलत आहे. स्वांतत्र्यानंतर शाळांती स्थिती आता बदलली आहे. अता देशात 7 लाख खेड्यांत 15 लाखांपेक्षा अधिक शाळा तर 1200 पेक्षा अधिक विद्यापीठे निर्माण झाली आहेत.

त्याचबरोबरच आयटी (IT), आयआयटीसारख्या (IIT) शिक्षण संस्था (Educational institutions) उभ्या राहिल्या आहेत. मोबाइल क्रांतीमुळे (The mobile revolution) उद्योग विश्वाला कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे नवनवीन आव्हाने तसेच संशोधनावर आधारीत उद्योग निर्माण झाले पाहिजे. तसेच येत्या कळात कला क्षेत्राला अधिक चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक योगेश राणे यांनी केले.

तसेच मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र कोठावदे, निलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, अ‍ॅॅड. देवदत्त जायखेडकर, संचालक प्रविण अमृतकर, पवन बागड, हर्षद चिंचोरे, अमोल शेंडे, अविनाश कोठावदे, सुधीर नावरकर, प्रशांत मोराणकर, चेतन येवला, राकेश ब्राह्मणकर राजेश कोठावेद, विनोद दशपुते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

यश पुरस्कारांचे वितरण

मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी परिक्षेत अमृता जान्हवी तर इयत्ता बारावी परिक्षेत श्रेया भदाणे या विद्यार्थीनींनी चांगले गुण मिळवून समाजाचे नाव उज्वल केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यश पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com