अपघातांच्या ठिकाणी गतिरोधक बसवा: जाधव

अपघातांच्या ठिकाणी गतिरोधक बसवा: जाधव

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण तालुक्यात (kalwan taluka) दुचाकी अपघाताचे (accidents) प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यामुळे अपघातात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात 2021 व 22 मध्ये 27 जणांनाच मृत्यू झाला आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने (Public Works Department) शाळा (schools), महाविद्यालये (college), शासकीय कार्यालये तसेच अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक (speed breaker) बसवावेत अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव (Shiv Sena taluka chief Ambadas Jadhav) आहे.

कळवण तालुक्यात कळवण (kalwan), अभोणा पोलीस ठाणे (Abhona Police Thane) अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चारचाकी वाहनांचा अपघात होऊन 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सण 2021 मध्ये कळवण पोलीस ठाणे हद्दीत 14 व 2022 मध्ये 6 तर अभोणा पोलीस ठाणे हद्दीत सण 2021 मध्ये 6 तर 2022 मध्ये 1 असे तालुक्यात एकूण अपघातात (accidents) 27 जनांनी आपले प्राण गमावले आहेत.

या अपघातामुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला आहे. लोकसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या हम दो, हमारे दो नियम व अटींचे बहुतांशी पालक पालन करीत. त्यामुळे कुटुंबात एक मुलगा, एक मुलगी असल्याचे प्रमाण जास्त आहे. अशा कुटुंबातल्या तरुणाचे अपघातात मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचा भविष्यातील आधारच हिरावला जात असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळतो.

अनेक कुटुंबात आई किंवा वडील आधीच दुर्धर आजारांचा सामना करीत आहेत. त्यांना आरोग्य (health) सेवेसाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तरुण मुलगा मोठा आधार असतो. त्याच तरुणाचे अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होते. त्यामुळे तालुक्यात अपघात होण्याचे ठराविक ठिकाण आहेत.

अशी ठिकाणे शोधून कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाने (Kalvan Tribal Public Works Department) त्या ठिकणी गतिरोधक बसवावेत जेणे करून तरुणांचे आवाहनावरील वेग नियंत्रणात राहील व अपघाताचे प्रमाण कमी होईल. अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.